debu choudhary

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (bikramjeet kanwarlal)यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. बिक्रमजीत यांच्या निधनानंतर देबू  चौधरी(debu choudhary Passed away) या कलाकाराचा कोरोनाने बळी घेतला आहे.

    प्रसिद्ध सितारवादक आणि पद्मभूषण पंडित देवव्रत चौधरी उर्फ देबू चौधरी(sitarist debu choudhary passed away) यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. देबू चौधरी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांना दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

    अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. बिक्रमजीत यांच्या निधनानंतर देबू  चौधरी या कलाकाराचा कोरोनाने बळी घेतला आहे.

    देबू चौधरी यांचा मुलगा प्रतिक चौधरी याने सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. शुक्रवारी रात्री देबू चौधरी यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.

    भारत सरकारने १९९२ मध्ये कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.