सायरा बानू,मधुबालाबरोबर आणखी एका अभिनेत्रींच्या प्रेमात होते दिलीप कुमार,चित्रपटापेक्षा कमी नाहीये त्यांच आयुष्य!

आज बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा वाढदिवस आहे. ११ डिसेंबर १९२२ मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला. दिलीप कुमार यांनी १९४४ साली 'जवरा भाटा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या महान कलाकराचं आय़ुष्य कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाहीये.

आज बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा वाढदिवस आहे. ११ डिसेंबर १९२२ मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला. दिलीप कुमार यांनी १९४४ साली ‘जवरा भाटा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या महान कलाकराचं आय़ुष्य कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाहीये.

Dilip Kumar

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची प्रेमकहाणी तर जग जाहीर आहे. १९६६ मध्ये त्यांनी सायरा बानू यांच्याशी लग्न केले. दिलीप कुमार आणि मधूबाला यांची अधूरी प्रेमकहाणीही अनेकांना माहितेय. पण तुम्हाला माहितेय का ४० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री कामिनी कौशल हे दिलीप कुमारांच पहिलं प्रेम होतं. १८४८ साली आलेल्या शहीद सिनेमाच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

पण कामिनी कौशल या विवाहीत होत्या त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं होतं. कामिनी यांच्या बहिणीचे निधन झाले. त्यानंतर घरच्यांच्या दबावामुळे कामिनी यांना लग्न करावे लागले. २०१४ साली एका मुलाखतीत कामिनी यांनी याचा खुलासा केला होता.

dilip kumar

१९६६ मध्ये त्यांनी सायरा बानू यांच्याशी लग्न केले. लग्नाच्यावेळी सायरा यांचे वय अवघे २२ वर्षे होते तर दिलीप यांचे वय ४४ वर्षे होते. आता ५० वर्षांहूनही अधिक काळ हे दोघे एकत्र आहेत. ‘अंदाज’, ‘बाबूल’, ‘डाग’, ‘मुघले आझम’, ‘राम आणि शाम’ या त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटसृष्टीमधील त्यांची कामगिरी पाहता त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात आला.

दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीवर तब्बल पाच-सहा दशकं अधिराज्य गाजवलं. ८० च्या दशकात दिलीप कुमार यांच्याबरोबर यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘दिलीप कुमार’ नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली.