करपलेल्या स्वयंपाकामुळे सोहा आणि कुणालमधलं प्रेम फुललं, वाचा त्यांची लव्हस्टोरी!

हळूहळू दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातूनच त्यांचं प्रेम फुलत गेलं. कुणालने खास फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं.

  बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. मात्र त्याने सुरुवातीच्या काळात गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीप्रमाणंच त्याची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच मजेशीर आहे. कुणाल आणि सोहाची ‘ढूँडते रह जाओगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान भेट झाली. मात्र त्यावेळी या दोघांमध्ये जास्त बोलणंही होत नसे. ते फक्त आपल्या चित्रिकरणावर लक्ष देत होते. त्यांनतर त्यांची पुन्हा भेट ‘९९’ या चित्रपटाच्या सेटवर झाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Soha (@sakpataudi)

  त्यांनतर त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि हळूहळू दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातूनच त्यांचं प्रेम फुलत गेलं. कुणालने खास फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं. खरतर सोहाला स्वयंपाकात अजिबात करता येत नाही. सोहा तर कधी किचनमध्येसुद्धा गेली नव्हती. मात्र कुणालला उत्तम स्वयंपाक करता येतो. तर दुसरीकडे लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिने पूर्ण स्वयंपाक करपवून ठेवला होता. तरीसुद्धा कुणालने ते अगदी प्रेमाने खाल्लं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Soha (@sakpataudi)

  २०१५ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांना इनाया ही 2 वर्षांची मुलगीसुद्धा आहे