‘करिअरमधली सगळ्यात महत्त्वाची भूमिका टॉयलेटमध्ये असताना मिळाली’, वाचा शर्मान जोशीबाबत घडलेला सगळ्यात भन्नाट किस्सा!

या चित्रपटात त्यानं साकारलेली राजू रस्तोगी ही भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका त्याला चक्क एका टॉयलेटमध्ये ऑफर करण्यात आली होती.

  शर्मन जोशी हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज शर्मनचा वाढदिवस आहे. त्यानं आजवर विनोदी, सस्पेन्स, अक्शन, रोमँटिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती राजकुमार हिरानी यांच्या थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटामुळं. या चित्रपटात त्यानं साकारलेली राजू रस्तोगी ही भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका त्याला चक्क एका टॉयलेटमध्ये ऑफर करण्यात आली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharman Joshi (@sharmanjoshi)

  टॉयलेटमध्ये दिला होकार

  तो एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी गेला होता. परंतु काही कारणास्तव मिटिंग रद्द झाल्यामुळं तो चित्रपट पाहण्यासाठी जवळच्याच एका सिनेमागृहात गेला. तिथं त्याची भेट राजकुमार हिरानी यांच्याशी झाली. ते आपल्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी तिथं आले होते. अर्थात गर्दी असल्यामुळं शर्मनला त्यांच्यासोबत फार काही बोलता आलं नाही. त्यानंतर तो टॉयलेटमध्ये गेला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे शर्मनला भेटण्यासाठी राजकुमार हिरानी टॉयलेटमध्ये आले. त्यांनी तिथंच आपल्या आगामी चित्रपटात त्यानं काम करावी अशी इच्छा व्यक्त केली. या चित्रपटाचं नाव, पटकथा, कास्टिंग याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही. तरी देखील शर्मननं त्यांना होकार दिला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharman Joshi (@sharmanjoshi)

  ही घटना घडून तीन महिने उलटले होते. तरी देखील राकुमार हिरानी यांच्या चित्रपटाचा पत्ता नव्हता. पण एके दिवशी दुपारी अचानक त्याला फोन आला अन् त्यांनी शर्मनला भेटायला बोलावलं. त्याचं रितसर ऑडिशन घेण्यात आलं. हे ऑडिशन त्यांना आवडलं. परिणामी राजू रस्तोगी ही भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मननं हा भन्नाट किस्सा सांगितला होता.