शिल्पा आणि योगा एक उत्तम समिकरण, वाचा Fitness queen शिल्पा शेट्टीचा प्रवास!

शिल्पाला चित्रपटांसाठी ऑफर्स मिळू लागल्या. पण शिल्पाचं मॉडेलिंग हे सुरूचं होत. शिल्पा एक ट्रेन भरतनाट्यम डान्सरदेखील आहे.

    फिटनेस क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस. ८ जून १९७५ ला मंगरूळ कर्नाटकात तिचा जन्म झाला. मुंबईत शिल्पाचं बालपण गेलं. तसेत मुंबईतच तिने शिक्षणही पूर्ण केलं होतं. शिल्पाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतरच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने लिम्कासाठी टीव्हीवर पहिली जाहिरात केली. त्यानंतर शिल्पाला चित्रपटांसाठी ऑफर्स मिळू लागल्या. पण शिल्पाचं मॉडेलिंग हे सुरूचं होत. शिल्पा एक ट्रेन भरतनाट्यम डान्सरदेखील आहे.

    १९९३ मध्ये शिल्पाने पहिल्या चित्रपटात केलं. बाजीगर या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत ती झळकली होती. यानंतर शिल्पाने अनेक सुपरहीट चित्रपट दिले. ‘मै खिलाडी तु अनाडी’, ‘हाखखंडी’, ‘इन्साफ’, ‘जमीर’, ‘धडकन’ असे अनेक सुपरहीट चित्रपट शिल्पाच्या नावावर आहेत.

    शिल्पा आणि योगा एक उत्तम समिकरण

    गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पा योग करत आहे. त्यामुळेच शिल्पा ही अतिशय फिट असून अनेकजन तिच्या फिटनेसचे चाहते आहेत. ती नियमित योगा करते. तसेच इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देते. त्याचबरोबर कुटींगची आवड असणाऱ्री शिल्पा तिचा एक कुकींग शो देखिल ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

    शिल्पा एक बिजनेस वुमन देखील आहे. काही वर्ष ती राजस्थान आयपीएल टीमची मालक होती. तिने टीमचा को ओव्हनर राज कुंद्रा याच्याशी २००९ मध्ये विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. याशिवाय शिल्पाने काही चित्रपटांची निर्मिती देखिल केली आहे. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे स्वतःच प्रायव्हेट जेट आहे. त्यातील एक शिल्पा देखील आहे.