‘राधा कृष्ण’तील ‘कृष्ण’सुमेध मुद्गलकरने दिल्या खास अंदाजात जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

या कथेच्या सुरुवातीपासून तो कृष्णाची भूमिका करत असल्याने त्याने प्रेक्षकांच्या हृदयात एक न बदलता येणारे स्थान निर्माण केले आहे.

    स्टार भारतचा सर्वात जास्त काळ चालणारा शो, ‘राधा कृष्ण’ गेल्या काही काळापासून आपल्या जीवनाचा एक भाग आहे. कृष्णा आणि राधाच्या प्रेमकथेतून या शोने आपल्या प्रेक्षकांचे सतत मनोरंजन केले आहे.  हा कार्यक्रम भारतीय टेलिव्हिजनचा एक महत्त्वाचा शो मानला जातो.

    यंदाच्या जन्माष्टमीला, ‘राधा-कृष्ण’तील आणि भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रिय ‘कृष्णा’ सुमेध मुदगलकर याने त्याच्यावर उत्कटपणे प्रेम करणारे चाहते आणि प्रेक्षकांप्रती प्रेम व्यक्त करत सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुमेध मुदगलकर यांनी ‘स्टार भारत’वरील ‘राधाकृष्ण’मध्ये व्रात्य आणि चंचल कृष्णाची भूमिका साकारून बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. कालांतराने, तो प्रेक्षकांच्या सर्वात प्रिय पात्रांपैकी एक बनला आहे.  या कथेच्या सुरुवातीपासून तो कृष्णाची भूमिका करत असल्याने त्याने प्रेक्षकांच्या हृदयात एक न बदलता येणारे स्थान निर्माण केले आहे.

    जन्माष्टमीच्या या शुभ सणानिमित्त सुमेध मुद्गलकरने चाहत्यांसोबत एक संदेश शेअर केला आहे.  तो सांगतो, “जन्माष्टमी हा एक सण आहे जो आपण सर्वांनी लहानपणापासून साजरा केला आहे.  हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास सणांपैकी एक आहे.  आता मी भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारत आहे, प्रत्येकाला मी त्यांच्या जन्माष्टमी उत्सवांचा एक भाग बनू इच्छितो आणि जर माझ्याकडे कृष्णासारखी शक्ती सर्वत्र असेल तर मला हा आनंददायक प्रसंग साजरा करण्यासाठी आमच्या दर्शक आणि चाहत्यांसोबत असणे आवडेल. ”