हरिवंशराय बच्चन यांच्या कविता बिग बींच्या आवाजात!

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन फोटोज शेअर केले आहेत. एक फोटो कलरफूल तर एक फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे.

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दैनंदिन जीवनात आलेले अनुभव ते चाहत्यांसोबत शेअर करतात. अनेकदा ते आपले दिवंगत वडील, प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कविताही शेअर करताना दिसतात. आता बिग बी वडिलांच्या कविता आपल्या आवाजात रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीच सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.

    अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन फोटोज शेअर केले आहेत. एक फोटो कलरफूल तर एक फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यांच्या हातात एक पुस्तक दिसत आहे त्यावर ‘प्रतिनिधी कविताए’ असे लिहिलेले दिसतेय. सोबत दिलेल्या पॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘‘पूज्य बाबूजींच्या लेखनापासून स्वतŠला दूर ठेवता येत नाही आणि आता त्यांचं उच्चारण, स्वतŠच्या स्वरात.’’ मात्र हरिवंशराय बच्चन यांच्या कोणत्या कवितांचे रेकॉर्डिंग केले जाणार, हे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही.