‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित Love Triangle असलेल्या चित्रपटात तापसी पन्नूचा बोल्ड अंदाज!

‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत. तसेच तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे.

    अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’मुळे चर्चेत आहे. आता ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे २९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तापसी पन्नूची कथा दाखवण्यात आली आहे. सध्या या ट्रेलरचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

    काय आहे ट्रेलरमध्ये

    तापसी राणीच्या भूमिकेत दिसत आहे. तर तिने रिशू म्हणजेच विक्रांत मेस्सीशी लग्न केले आहे. पण एका ब्लास्टमध्ये विक्रांतचे निधन होते. विक्रांतचे निधन कसे झाले याचा तपास ‘CID’मधील अभिनेता आदित्य श्रीवास्तव करत असतो. तपासादरम्यान तापसीचे हर्षवर्धनसोबत अफेअर असल्याचे समोर येते. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहता एकंदरीत चित्रपटाची कथा ही रंजक असणार हे दिसत आहे.

    ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत. तसेच तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे. ‘हसीन दिलरुबा’ हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे.