‘हसीन दिलरुबा’ टॅापमोस्ट ट्रेंडींग चित्रपट, भारतासह ‘या’ देशात ठरला नंबरवन!

फिल्ममेकर आनंद एल. राय आणि त्यांच्या कलर यलो प्रोडक्शन्सनं नेहमीच भारतातील छोट्या शहरांमधील ग्रेट स्टोरीज अतिशय सुंदररीत्या प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत

    तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पहात होते तो ‘हसीन दिलरुबा’ मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. रिलीज झाल्यापासून ‘हसीन दिलरुबा’ टॅापमोस्ट ट्रेंडींग चित्रपट बनला आहे. भारत, युएई, कॅनडा, बांग्लादेश आणि इतर बऱ्याच देशांमध्ये हा चित्रपट टॅापवर आहे. या चित्रपटाचा रेसी थ्रिलर जॅानर प्रेक्षकांना चांगलाच भावल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

    फिल्ममेकर आनंद एल. राय आणि त्यांच्या कलर यलो प्रोडक्शन्सनं नेहमीच भारतातील छोट्या शहरांमधील ग्रेट स्टोरीज अतिशय सुंदररीत्या प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. यात ‘न्यूटन’, ‘तुंबाड’, ‘मनमर्जीयां’, ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांच्या यादीत आता ‘हसीन दिलरुबा’चा समावेश झाला आहे. एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या या प्रोडक्शन हाऊसच्या ‘हसीन दिलरुबा’नं रसिकांच्या मनात घर केलं आहे. तापसीनं सादर केलेल्या हसीनाच्या प्रेमात प्रेक्षक आहेत. या चित्रपटाद्वारे तापसीनं पुन्हा एकदा स्वत:ला एका वेगळ्या भूमिकेत सिद्ध केलं आहे.

    तापसीनं यात साकारलेलं इंन्टेन्स कॅरेक्टर खऱ्या अर्थानं रिलेटेबल आहे. यासोबतच विक्रांत मस्सीनं साकारलेलं कॅाम्पेक्स कॅरेक्टरही छान झालं आहे. हर्षवर्धन राणेचंही एक वेगळं रूप पहायला मिळतं. या सर्व गोष्टींच्या बळावर ‘हसीना’ नंबर वन बनली आहे.