सुशांत प्रकरणावरून घृणास्पद राजकारण – खासदार संजय राऊत

बिहारच्या सुशांत सिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला केंद्र सरकारकडून लगेच परवानगी मिळणे. घाईघाईने घडामोडी घडत असल्याने पडद्यामागे इतर कोणी हालचाल करत असल्याचा संशय आहे. तसेच हे प्रकरण राजकीय फायद्यासाठीही वापरले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी विविध प्रकारची माहिती दिवसेंदिवस समोर येत आहे. तसेच दोनच दिवसांपूर्वी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ईडीसमोर हजर झाली होती. यावेळी तिची चौकशी करण्यात आली होती. परंतु या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली असून यामध्ये ‘सुशांत सिंग प्रकरणावरून घृणास्पद राजकारण’ करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

बिहारच्या सुशांत सिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला केंद्र सरकारकडून लगेच परवानगी मिळणे. घाईघाईने घडामोडी घडत असल्याने पडद्यामागे इतर कोणी हालचाल करत असल्याचा संशय आहे. तसेच हे प्रकरण राजकीय फायद्यासाठीही वापरले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच सीबीआय ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव चर्चेत होतं. परंतु “हे तर गलिच्छ राजकारण” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एका परिपत्रकाद्वारे विरोधकांना सविस्तर उत्तर दिलं आहे.