‘मानव हा कायम अर्चनाचा…’, सुशांतच्या आठवणीत भावूक झाली अंकिता, VIDEO शेअर करत म्हणाली…

अंकिता लोखंडे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह आली होती. यावेळी तिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फॅन मेड केक कापून तिच्या फॅन्ससोबत सेलिब्रेशन देखील केलं.

  छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. १ जून २००९ रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. या मालिकेतल्या मानव-अर्चनाच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मानव-अर्चनाची भूमिका साकारतानाच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचं नातं प्रेमात बदलू लागलं होतं. जवळजवळ ६ वर्ष दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. ‘मानव-अर्चनाच्या या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केलाय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  अंकिता लोखंडे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह आली होती. यावेळी तिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फॅन मेड केक कापून तिच्या फॅन्ससोबत सेलिब्रेशन देखील केलं. यावेळी तिने सुशांतसोबतच्या काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  सुशांत विषयी अंकिता म्हणते,

   “सुशांत आता आपल्यात नाही…त्याच्याशिवाय ‘पवित्र रिश्ता’ हा अपूर्ण आहे. अर्चनाचा मानव फक्त सुशांतच होता. मला विश्वास आहे, तो आता जिथे कुठे असेल तो तिथून मला पाहत असणार…तो जिथे कुठे आहे, तो आनंदी रहावा…सुशांतने मला अभिनय शिकवला…मला तेव्हा काहीच येत नव्हता…मी ज्यूनियर होती आणि तो माझ्यापेक्षा जास्त सिनियर होता…तो एक हूशार कलाकार होता…त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला खूप नशिबवान समजत होते.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)