घरगुती हिंसाचार प्रकरणात पॉप सिंगर हनी सिंहच्या अडचणीत वाढ, सुनावणीला गैरहजर राहिल्याने कोर्टाने सुनावले

यो यो हनी सिंह(Yo Yo Honey Singh) विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने(Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence Case) तक्रार दिल्लीतील(Delhi) तीस हजारी कोर्टात(Tis Hazari Court) दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली.

    पॉप सिंगर यो यो हनी सिंह(Yo Yo Honey Singh) विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने(Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) तक्रार दिल्लीतील(Delhi) तीस हजारी कोर्टात(Tis Hazari Court) दाखल केली होती. हनी सिंगच्या पत्नीने १० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या दिल्लीतील तीस हजारी कोर्टातील सुनावणीला यो यो हनी सिंह अनुपस्थित राहिल्याने कोर्टाने त्याला फटकारले आहे.

    हनी सिंहच्या वकिलांनी हनी सिंहची प्रकृती नीट नसल्याने तो सुनावणीला हजर राहू शकत नाही, असे सांगितले. पुढच्या सुनावणीला तो हजर राहील, असं आश्वासन हनी सिंहच्या वकिलांनी दिलं. यावरून न्यायालयाने हनी सिंहला फटकारलं आहे. न्यायालयाने हनी सिंहचे मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हनी सिंहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

    सुनावणीच्या वेळी हनी सिंगच्या वकिलांनी या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सुनावणीसाठी हनी सिंहच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर बोलताना ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असं देखील न्यायालयाने म्हटलं. यावर हनी सिंहच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंह लवकरात लवकर न्यायालयात वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर करेल, असं म्हटलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी  पुढच्या महिन्यात ३ सप्टेंबरला होणार आहे.