म्हणून श्वेता तिवारी रात्रभर मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवते, मुलाखतीत सांगितलं कारण!

श्वेता आणि अभिनव यांच्यामधील वाद जगजाहिर आहे. सध्या श्वेता मुलांपासून लांब एका शोचे चित्रीकरण करत आहे. श्वेता रात्री मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवून झोपते असा खुलासा नुकताच तिने केला आहे.

  अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात वाद सुरू आहेत. श्वेता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांचा सांभाळ करतेय. मात्र श्वेताने मुलाला आपल्या ताब्यात द्यावं यासाठी अभिनवची धडपड सुरू आहे. श्वेता आणि अभिनव यांच्यामधील वाद जगजाहिर आहे. सध्या श्वेता मुलांपासून लांब एका शोचे चित्रीकरण करत आहे. श्वेता रात्री मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवून झोपते असा खुलासा नुकताच तिने केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

  श्वेताने एका मुलाखत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये तिने मुलांपासून लांब असताना त्यांच्याशी कसा संवाद साधते हे सांगितले आहे. ‘रात्रीच्या वेळी आम्ही व्हिडीओ कॉल सुरु ठेवून झोपतो जेणे करुन सकाळी उठल्यानंतर आम्ही एकमेकांना पाहू शकू. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत असतो. असे श्वेता म्हणाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

  सध्या श्वेता ‘खतरोंके खिलाडी’ या शोचे चित्रीकरण करत आहे. त्यासाठी ती अफ्रिकेतील केपटाउन येथे गेली आहे. ती तेथून तिच्या मुलांना सतत फोन आणि व्हिडीओ कॉल करत आहे.