‘हिडन’ मध्ये दडलंय काय? १६ जुलैला उलडणार रहस्य!

'गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन' करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचं कुतूहल आहे. ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली काल्पनिक मेगा वेब सिरीज आहे.

    मागील काही दिवसांपूर्वी पोस्टर लाँच केल्यानंतर ‘हिडन’ या आगामी वेब सिरीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. या वेब सिरीजमध्ये नेमकं काय आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असताना १६ जुलै रोजी पिंग पॉंग ओटीटीवर ‘हिडन’ रिलीज होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. नुकतंच या हिंदी वेब सिरीजच्या ट्रेलरचं प्रदर्शन करण्यात आलं. ‘हिडन’मधील कलाकार, तंत्रज्ञांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील ‘द क्लब’ येथे ‘हिडन’चा ट्रेलर लाँच करण्यात आला.

    ‘गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन’ करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचं कुतूहल आहे. ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली काल्पनिक मेगा वेब सिरीज आहे. तिन्ही सीजन्स पाहिल्यानंतरच यातील रहस्याचा उलगडा होणार आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे. हिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.

    पोलीस, गुन्हे, ड्रग्ज, खून, रहस्य यांचे वेगवान चित्र हिडन मध्ये पहायला मिळणार आहे. विशाल सावंत यांनी या वेब सिरीजचं लेखन-दिग्दर्शन केलं असून, संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मनवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत.