आंतरराष्ट्रीय एकपात्री स्पर्धेत नवी मुंबईच्या ‘हितार्थ पाटील’ची बाजी

नवी मुंबई : पारिजात मुंबई व अभिनयधारा कला संस्था या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय एकपात्री स्पर्धेत नवी मुंबईच्या हितार्थ पाटील या बालकलाकाराने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या

 नवी मुंबई : पारिजात मुंबई व अभिनयधारा कला संस्था या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय एकपात्री स्पर्धेत नवी मुंबईच्या हितार्थ पाटील या बालकलाकाराने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या अशा स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांची माने जिंकली.

पारिजात मुंबई व अभिनयधारा कला संस्था या संस्थेच्यावतीने बालकलाकरांसाठी आंतरराष्ट्रीय लॉकडाऊन ऑनलाईन एकपात्री सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. भारतातूनच नव्हे तर अमेरिका, नेदरलँड, ब्रिटन, दुबई, अबुदाबी येथून नऊशेच्यावर बालकलाकारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये अ व ब गटामध्ये प्रत्येकी २५ असे स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. यामध्ये ब गटात जी ११ ते १६ वर्षे वयोगटातील मुले होती. त्यामध्ये खूप चुरशीच्या स्पर्धेत नवी मुंबईच्या हितार्थ पाटील या बालकलाकाराचा प्रथम क्रमांक आला.  अभिनेता सुमीत राघवन यांनी या स्पर्धेचा निकाल घोषित केला. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी केले. ही स्पर्धा जिंकल्यावर हितार्थने आनंद व्यक्त करीत श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले ज्यांनी त्या अभिनयाकरीता नेहमी प्रोत्साहन दिले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सादर केलेल्या एकपात्रीची संहिता त्याचे वडील उपदेश पाटील यांनी लिहिली आहे. 

हिंदीत कलर्स टिव्हीवरील ‘कोड रेड’, सोनी टिव्हीवरील ‘मन मे है विश्वास’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘हासील’ व झी टिव्हीवरील ‘काला टिका’, याचबरोबर ‘एक विवाह ऐसा भी’, दूरदर्शनवरील ‘दो सौ करोड कि बोटल’, मराठीमध्ये ‘नकळत सारे घडले’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘विठ्ठू माऊली’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘तू माझा सांगाती’मध्ये संत ज्ञानेश्वरांची भूमिका, ‘लक्ष्य’, ‘गोठ’, ‘बाळू मामाच्या नावानं चांग भलं’ व कित्येक लघुपटात हीतार्थच्या प्रमुख भूमिका आहेत.