priyanka chopra

प्रियांकानं देखील ते आमंत्रण स्विकारत खास पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आले होते. परंतु खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष  वेधून घेतलं ते प्रियांकानं. तिनं आपल्या पतीसोबत धम्माल होळी खेळली.

  होळी हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय सण आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण होळी हा सण साजरा करतात. दरम्यान होळीच्या निमित्तानं सध्या सेलिब्रिटींचे रंगपंचमी खेळतानाचे व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहेत. विशेष म्हणजे ही खास पार्टी चर्चेत आली ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा अन् तिचा पती निक जोनासमुळं. त्यांनी अशी काही धम्माल होळी खेळली की सर्वजण चकितच झाले.

  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरं तर गेल्या वर्षीचा आहे. लग्न झाल्यानंतर प्रियांका पहिल्यांदाच आपल्या पतीसोबत भारतात परतली होती. त्यावेळी तिला ईशा अंबानीनं होळी खेळण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर आमंत्रण दिलं होतं.