सणाच्या दिवशीही आईच्या वाटेला येणार दुख:च, पुजेचा मान मिळणार अनिरूद्ध आणि संजनाला!

सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल.

    स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते. अरुंधतीच्या तर उत्साहाला पारावर नसतो.

     

    सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखिल सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते.

    अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या २८ मार्चच्या  महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा महाएपिसोड रविवार २८ मार्चला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर