चित्रपटात असे चित्रित केले जातात किसींग सीन, तुमचा कदाचीत विश्वासही बसणार नाही!

अनेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की, इंटिमेट सीन्स चित्रपटात कसे शूट केले जातात? आपण लहान आणि मोठ्या पडद्यावर जे पहात आहोत, अर्थात किसिंग सीनपासून ते बेड सीनपर्यंत, हे कसे शूट होतात हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांनाच असते

  चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रेम एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. किसिंग, सेक्स अशा काही दृश्यांवर त्याकाळी मर्यादा होत्या. पण त्यानंतर सर्रास असे सीन चित्रपटात दिसू लागले.

  आपण एखादा जुना चित्रपट पाहिल्यास, नायक आणि नायिका यांच्यात काहीतरी घडून येताच कॅमेरा काळोख, दिवा, भिंत किंवा दोन फुलांवर लक्ष केंद्रित करतो किंवा त्या खोलीत पूर्ण अंधार पडतो. पण आजच्या चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन ही काही मोठी गोष्ट नाही. विशेषत: ओटीटी आणि वेबसीरीजचा काळ आला आहे तेव्हापासून या सीनचा भरणा वेबिरीजमध्ये असतो.

  अनेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की, इंटिमेट सीन्स चित्रपटात कसे शूट केले जातात? आपण लहान आणि मोठ्या पडद्यावर जे पहात आहोत, अर्थात किसिंग सीनपासून ते बेड सीनपर्यंत, हे कसे शूट होतात हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांनाच असते. क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, असे अंतरंग दृश्य देखील त्यांच्या अभिनयाचा एक भाग असतात.

  मिठी मारणे, किस करणे, हातांनी स्पर्श करणे आणि नंतर कॅमेरा अँगल असा ठेवणे की, ज्यामुळे शरीराचा काही भाग झाकून ठेवता येतो, यालाच ब्युटी शॉट्स म्हणतात. ही सर्व कॅमेरा तंत्रे आहेत. या दरम्यान कपड्यांची काळजी घ्यावी लागते. बेड सीन करण्यासाठी २ किंवा ३ कपडे देणे, जेणेकरून तो सीन करतना तो क्षण तयार होईल. यासाठी बेडवर सॅटिन बेडशीट्स वापरली जातात आणि त्याचे आवरण बनवून केवळ भ्रम निर्माण केला जातो.

  हिरव्या भाज्यांना केले जाते कीस

  अनेकदा जुन्या काळाप्रमाणे क्रोमा शॉट्स घेतो. क्रोमा म्हणजे निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कोणतेही आवरण, जे नंतर बदलले जाते. उदाहरणार्थ, जर अभिनेता आणि अभिनेत्रीचा किसिंग सीनवर आक्षेप असेल, तर त्या दरम्यान त्यांच्यामध्ये हिरवा भोपळा ठेवला जातो. हिरवा रंग असल्याने तो क्रोमचे कार्य करते. दोघांनीही हा लीप लॉक सीन केला की, नंतर पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान, हा हिरवा भोपळा अदृश्य केला जातो आणि प्रेक्षकां असे वाटते की दोघांनीही किस केले आहे.

  आस्था ‘अंधाधुन’, ‘बदलापूर’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तिला असे वाटते की, अ‍ॅक्शन सीन्सच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच या दृश्यांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे असावीत. जर्मन वेबसाईट ड्यूश वेलेला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते की, प्रेक्षकांना असे वाटते की संभोग झाला आहे, परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही.  “कारण यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे त्यांचे पालन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण काही मूलभूत गोष्टी आहेत. यासाठी आम्हाला दोघांमध्ये काही अडथळे निर्माण करावे लागतात. दृश्यांवर दोघांशीही चर्चा करावी लागते. अशी एक सीमा असते, जी ओलांडली जाऊ नये. तथापि, बॉलिवूडमध्ये एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलेल्या अभिनेत्री-अभिनेत्रींवर बरेच काही अवलंबून आहे.