अरबाजनंतरच्या घटस्फोटानंतर आता मुलगाही जातोय मलायकाला सोडून, आईची इमोशनल पोस्ट व्हायरल!

मलायका घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन  कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज देखील एका इटालियन मॉडेल आणि अभिनेत्रीला डेट करत आहे.

  अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. मलायका सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती तिच्या मुलाला प्रचंड मिस करतेय. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही ते दोघेही मुलासाठी नेहमी एकत्र दिसतात. नुकतच या मलायकाच्या कुटुंबाबरोबर डिनर डेटवर गेला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

  तर मलायकाचा मुलगा अरहान हा उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाला आहे. त्यामुळे मलायका भावूक झाली आहे. तिने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मलायका म्हणते, आम्ही दोघेही एका नवीन प्रवासासाठी जातोय. मला अरहानचा खूप अभिमान आहे. उंच भरारी घे, तुझी स्वप्न पुर्ण कर. तिने त्याच्यासोबत एक फोटोही शेअर केला आहे.

  मलायका घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन  कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज देखील एका इटालियन मॉडेल आणि अभिनेत्रीला डेट करत आहे.