priyanka chopra

अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात नसली तरी ती नेहमी चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियावरही खूप अक्टीव्ह असते. ती प्रत्येक फोटोतून आपले अपडेट चाहत्यांपर्यंत पोहचवते. त्यामुळे तीचे चाहतेही तिच्याशी कायम कनेक्ट असतात. प्रियांकाने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलीये.

प्रियांका ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तीच्या फोटोची वाहवा केलीये.

केवळ चाहते नाही तर सेलेब्रेटींनी या फोटोवर कमेंटस केल्या आहेतय प्रियांकाच्या अदांवर सेलेब्रेटीही फिदा झाले आहेत. अभिनेता हृतिक रोशन आणि राजकुमार राव देखील अवाक झाले आहेत.

प्रियांकानं पांढरं टी-शर्ट, निळी जीन्स आणि पाऊडर ग्रे बूट्स परिधान करुन एक फोटो शूट केलं. हे फोटोशूट तिने एका फॅशन मॅगझिनसाठी केलं होतं. त्यापैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधील प्रियांकाचं सौदर्य पाहून हृतिक आणि राजकुमार देखील घायाळ झाले आहेत. क्या बात है असं म्हणत दोघांनी प्रियांकाची तोंड भरुन स्तुती केली आहे. तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटींसोबतच जगभरातील लाखो चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.