hrithikroshan

सिद्धार्थ आनंदने हृतिक रोशनसोबत 'बॅँग बॅँग' चित्रपट साकारला होता. या चित्रपटात हृतिकला सिद्धार्थचे काम आवडल्यानंतर दोघांनी 'वॉर' नावाचा एक अॅक्‍शन चित्रपट केला. हा 2019चा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. यापूर्वी कधीच न दिसलेली हृतिकची स्टाईल या चित्रपटात पाहावयास मिळाली. आता सिद्धार्थ आणि हृतिक 'फायटर' चित्रपटाची योजना आखत आहेत. ज्याचा श्रीगणेशा २०२२ मध्ये सुरू होऊन वर्षाअखेर तो रिलीज करण्यात येणार आहे.

सिद्धार्थ आनंदने हृतिक रोशनसोबत ‘बॅँग बॅँग’ चित्रपट साकारला होता. या चित्रपटात हृतिकला सिद्धार्थचे काम आवडल्यानंतर दोघांनी ‘वॉर’ नावाचा एक अॅक्‍शन चित्रपट केला. हा 2019चा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. यापूर्वी कधीच न दिसलेली हृतिकची स्टाईल या चित्रपटात पाहावयास मिळाली. आता सिद्धार्थ आणि हृतिक ‘फायटर’ चित्रपटाची योजना आखत आहेत. ज्याचा श्रीगणेशा २०२२ मध्ये सुरू होऊन वर्षाअखेर तो रिलीज करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिक जेव्हा ‘वॉर’ चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हाच सिद्धार्थने ‘फायटर’ चित्रपटाची कथा हृतिकला सांगितली होती, ज्याची पार्श्‍वभूमी फायटर जेट आहे. हृतिकला ही कल्पना आवडली. लॉकडाऊनदरम्यान सिद्धार्थने कथेवर काम सुरू केले. याबाबत हृतिकनेही महत्त्वपूर्ण इनपुट्‌स दिली असून हृतिकच्या देखरेखीत स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

सिद्धार्थ सध्या ‘पठाण’ चित्रपटात व्यस्त आहे.  २०२१ च्या दिवाळीपूर्वी पूर्ण होणार आहे. यानंतर तो ‘फायटर’ चित्रपटाची सुरुवात करणार आहे. या एरियल अॅक्‍शन थ्रिलरमध्ये हृतिक लार्जर दॅन लाइफच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्ण अॅक्‍शनने भरलेला असेल. फायटर संपल्यानंतर हृतिक ‘क्रिश 4’च्या शुटिंगला सुरुवात करेल. याशिवाय तो ‘वॉर-२’चे सुद्धा नियोजन करीत आहे.