‘तो’ Video पाहून सोनूला धक्का बसला, VIDEO शेअर करत दिली अशी प्रतिक्रिया!

सोनू सूदने तेलुगुमध्ये एका बातमीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील करीमनगर येथे मटण शॉपला सोनूचं नाव देण्यात आलं आहे.

    बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने कोरोना काळात नागरिकांना मोठी मदत केली. गरीबांच्या पाठिशी तो खंबीरपणे उभा राहिला. अनेकांसाठी तो अक्षरश: देव ठरला. अनेक ठिकाणी तर सोनू सूदची मंदीरही बांधण्यात आली. अशातच सोनूने एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.

    सोनू सूदने तेलुगुमध्ये एका बातमीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील करीमनगर येथे मटण शॉपला सोनूचं नाव देण्यात आलं आहे. या प्रतिक्रिया देत अभिनेत्याने लिहिलं आहे की, मी शाकाहारी आहे आणि माझ्या नावावर मटणाचं दुकान? काही शाकाहारी दुकान सुरू करण्यासाठी त्यांची मदत करू शकतो?

    त्यावर एका चाहत्याने सोनूला माहिती दिली आहे की, मटण शॉपचा मालिक ग्राहकांकडून ५० रुपये कमी आकारत आहे. हे जमा केलेले ५० रुपये सोनू सूदच्या फाऊंडेशनला दान करण्याचा निर्णय दुकानाच्या मालकाने घेतला आहे.