आदित्य ठाकरेंना ओळखत नाही, भेटलेही नाही; रिया चक्रवर्तीचा खुलासा

शिवसेनेच्या नेत्यांबद्दल ऐकीव माहिती आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना कधीही न भेटल्याचं रियाने स्पष्ट केलंय. वकील सतीश मानेशिंदे यांच्यावतीने हे स्टेटमेन्ट मीडियासमोर ठेवण्यात आलं. रिया विरोधात पोलीस आणि ईडीच्या चौकशीत काहीही मिळालेलं नाही, त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप निरर्थक असल्याचंही त्यांनी या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलंय.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांत प्रकरणाचं राजकारण होत असल्याचं रियाच्या वकिलांनी सांगितलं आहे. रिया आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीबद्दल होत असलेल्या चर्चांबाबत रिया चक्रवर्तीकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रियाच्या म्हणण्यानुसार, ‘ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटलेले नाही’ असं रिया चक्रवर्तीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय.

शिवसेनेच्या नेत्यांबद्दल ऐकीव माहिती आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना कधीही न भेटल्याचं रियाने स्पष्ट केलंय. वकील सतीश मानेशिंदे यांच्यावतीने हे स्टेटमेन्ट मीडियासमोर ठेवण्यात आलं. रिया विरोधात पोलीस आणि ईडीच्या चौकशीत काहीही मिळालेलं नाही, त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप निरर्थक असल्याचंही त्यांनी या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलंय. रियाच्या खात्यांसह इनकम टॅक्स रिटर्नची तपासणी ईडीने केली. या तपासणीत त्यांना रियाविरुद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही.

रियाने सुशांतच्या खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. त्याच्या सर्व इनकम टॅक्स रिटर्न्सची चौकशी पोलीस आणि ईडीने केलीय. असंही रियाच्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार का यावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडेच द्यावा याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.