kamal khan

कमाल आर खानचे(kamal r khan) (krk)प्रत्येक ट्विट(tweet) चर्चेचा विषय ठरत असते. विविध विषयांवर तो आपली मते मांडत असतो. त्याच्या ट्विटकडे जास्त कुणी लक्ष देत नसले तरी नेटकरी त्याचे ट्विट आवर्जून वाचत असतात. आता त्याने केलेले आणखी एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्याने असे म्हटले आहे की, जर मला काही झाले तर बॉलिवूडमधील मोठे कलाकार जबाबदार असतील.

केआरकेने त्याच्या जिवाला धोका असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्याने पुढे म्हटले आहे की, मी सर्वांना सांगू इच्छितो की जर मला काही झाले तर त्याला करण जोहर, सलमान खान, अक्षय कुमार, आदित्य चोपडा, साजिद नाडियाडवाला जबाबदार असतील. त्यांनी मला मारण्याचा प्लॅन केला आहे. त्याने या ट्विटमध्ये पंतप्रधाव नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एका न्यूज चॅनेलला टॅग केले आहे. या ट्विटवरून लोकांनी कंगनाला कॉपी करतोयस का असे विचारले आहे.