ira khan

इरा खानने सुरु केलेल्या कामासाठी लागणारे २५ इंटर्न्स यांना एक महिना काम करायला लागणार आहे. एवढचं नाही तर हे इंटर्न्स देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले असायला हवे

  अभिनेता अमिर खानची मुलगी इरा खान हीने लोकांमध्ये मेंटल हेल्थबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. डिप्रेशन किंवा अनेक मेंटल प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी इराने मोठी भुमिका घेतली आहे. एवढचं नाही तर तिने सुरु केलेल्या कामासाठी तिला इंर्टन्सची देखील गरज आहे. या कामामध्ये मेंटली डिस्टर्ब असलेल्या लोकांना फोन करुन त्यांच्याशी संवाद करायचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून ही पोस्ट इराने शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

   

  काय आहे पोस्टमध्ये

  इरा खानने सुरु केलेल्या कामासाठी लागणारे २५ इंटर्न्स यांना एक महिना काम करायला लागणार आहे. एवढचं नाही तर हे इंटर्न्स देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले असायला हवे. प्रत्येक राज्यातील एका व्यक्तीला ही इंटर्नशिप मिळणार असून त्यांना पाच हजार रुपये पगार देखील देण्यात येणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या इंटर्न्सना वेगवेगळ्या भाषा बोलता यायला हव्यात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

   

  इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने मेंटल हेल्थबाबत अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. एवढचं नाही तर तिच्या कामाची जाहिरात आणि माहिती सुद्धा तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुनच दिली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ira Khan (@khan.ira)