‘हा’ व्यक्ती ठरला सलमान खान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपच निमित्त, पण रोष मात्र पत्करावा लागला विवेक ओबेरॉयला!

नोव्हेंबर २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती.

  भाईजान सलमना खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर त्यांच्या अफेअरपेक्षाही त्यांच्या ब्रेकअपची चर्चा जास्त झाली. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vibes. (@couplet_gems)

  संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ऐश्वर्याला अनेकवेळा सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील बघितलं गेलं. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले नातं कधीच पसंत नव्हतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bolly Nuts with EF (@bolly_nuts_f)

  तो प्रसंग घडला आणि

  नोव्हेंबर २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गैरवर्तुणूक केली होती असे म्हटले जाते. सलमानच्या या वागण्यामुळेच ऐश्वर्याच्या कुटुंबियांनी तिला हे नाते तोडायला सांगितले होते असे म्हटले जाते आणि त्यातही तिच्या वडिलांनी यात पुढाकार घेतला होता अशी चर्चा त्याकाळात रंगली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vibes. (@couplet_gems)