टीआरपीच्या शर्यतीतून ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बाहेर, तर या मालिकेनं पटकावलं प्रेक्षकांच्या मनात स्थान!

गेल्या काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणसला मागे टाकत 'मुलगी झाली हो' या मालिकेने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

  मालिकांच्या टीआरपीवरून मालिकेची लोकप्रियता ठरते. सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असणाऱ्या आई कुठे काय करते मालिकेचा टॉप ५च्या यादीत समावेश नाही. तसेच या रेसमधून येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिकादेखील बाहेर पडली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणसला मागे टाकत ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  आता आई कुठे काय करते, येऊ कशी तशी मी नांदायला आणि देवमाणूस या मालिकांना मागे टाकत ‘मुलगी झाली हो’ ही मालिका अव्वल ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही मालिका आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आहे. काही आठवड्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेली देवमाणूस मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे. ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  पाचव्या क्रमांकावर ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आहे. अग्गंबाई, सुनबाई, येऊ कशी तशी मी नांदायला, सांग तू आहेस ना? आई कुठे काय करते? या मालिका टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. आता तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर हे आम्हाला नक्की सांगा.