In the tv serial Gudiya Hamari Sabhi Pe Bhari on & TV Sambhavana Seth plays the role of Mahua
'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये संभावना सेठचा महुआच्‍या भूमिकेत 'धमाकेदार प्रवेश'

मुंबई : बॉलिवूड सेन्‍सेशन, उत्तम अभिनेत्री व व्लॉगर संभावना सेठने (Sambhavana Seth) मनोरंजन क्षेत्रामध्‍ये तिची छाप पाडली आहे. अभिनेत्री टे‍लिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे. ती ॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘गुडिया हमारी सभी पे भारी’ (Gudiya Hamari Sabhi Pe Bhari) मध्‍ये प्रवेश करत सर्वोत्तम अभिनयासह सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. मालिकेमध्‍ये राधेची (रवी महाशब्‍दे) माजी पत्‍नी महुआची भूमिका साकारताना दिसणारी संभावना दृढ नाते असलेल्‍या गुप्‍ता कुटुंबाच्‍या (Gupta Family) जीवनामध्‍ये विलक्षण हास्‍यजनक कहर निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे.

मनोरंजन व हास्‍याच्‍या अतिरिक्‍त डोसची भर करत हरभेजीने योजना आखत पाठवलेली महुआ तिच्‍या मुलासोबत येते, ज्‍यामुळे कुटुंबामध्‍ये गोंधळ निर्माण होतो आणि सरला (समता सागर) हवेलीमध्‍ये राहण्‍यास जाते. पण सर्वात मजेशीर बाब म्‍हणजे राधेला सरला व्‍यतिरिक्‍त दुस-या महिलेसाबत विवाह केल्‍याचे आठवत नाही आणि तिच्‍यापासून मुलगा असल्‍याचे देखील आठवत नाही. या तिन्‍ही पात्रांमध्‍ये गोंधळाची पण विनोदी स्थिती निर्माण होते.

आपला आनंद व्‍यक्‍त करत महुआची भूमिका साकारणारी संभावना सेठ म्‍हणाली,”मला एण्‍ड टीव्‍हीवरील हलकी-फुलकी मालिका ‘गुडिया हमारी सभी पे भारी’मध्‍ये महुआची भूमिका साकारण्‍यासह टेलिव्हिजनवर परतण्‍याचा आनंद झाला आहे. मी पहिल्‍यांदाच हलक्‍या-फुलक्‍या शैलीतील मालिकेमध्‍ये काम करणार आहे. महुआच्‍या मालिकेमधील प्रवेशासह प्रेक्षकांना विनोदी गोंधळ व हास्‍यपूर्ण मनोरंजन पाहायला मिळणार आहे. मला विश्‍वास आहे की, प्रेक्षकांना माझी ही भूमिका आवडेल आणि ते माझ्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव करतील व पाठिंबा देतील. मी मालिकेमधील प्रत्‍येकासोबत काम करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.”

संभावना सेठचा महुआच्‍या भूमिकेतील धमाकेदार प्रवेश पाहा ‘गुडिया हमारी सभी पे भारी’मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर