‘बँग बँग’ या मोठ्या अॅक्शन थ्रिलर फ्रँचायजीच्या लोगोचे अनावरण

ऑल्ट बालाजी आणि झी ५ द्वारे आपल्या विविध शैलींनी अनेक दमदार कंटेन्टने मनोरंजन केल्यानंतर, आता हे दोन विशाल ओटीटी मंच तरुणाईला आणखी एका रोलर-कोस्टर राईडवर घेऊन जाण्यास तयार आहेत. या गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर, ऑल्ट बालाजी आणि झी ५ ने आपल्या नव्या अॅक्शन थ्रिलर फ्रॅंचायजी ‘बँग बँग’च्या धमाकेदार लोगोचे अनावरण केले.

या शोमध्ये रहस्य, सस्पेंस, धमाकेदार अॅक्शन आणि अनेक खऱ्या खोट्या रहस्यांमध्ये खूप सारा यूथ ड्रामा पाहायला मिळणार आहे, ज्यातील रहस्य एकापाठोपाठ अलगद उलगडत जाईल. आपल्या शीर्षकानुसार ‘बँग बँग’ अॅक्शन-थ्रिलर फ्रँचायजी आपल्या भव्यतेसोबत ओटीटीच्या अवकाशात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वेब सीरिज फ्रँचायजीमधील एक असेल.अक्षय बीपी सिंहची निर्मिती आणि अभिषेक कपूरचे दिग्दर्शन असलेल्य बँग बँगच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.