‘या’ कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या अनोख्या शुभेच्छा

आज देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीय वेग वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. परंतु या वर्षीच्या या स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावट आले आहे

मुंबई : आज देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीय वेग वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. परंतु या वर्षीच्या या स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावट आले आहे. असे असताना देखील अनेक सिनेकलाकारांनी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 अनेक दिग्गज कलाकारांनी ट्विटवर च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार,  माधुरी दीक्षित, काजोल, विकी कौशल यांच्यासह अनेक कलाकारांनी अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या.