‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे व्हर्च्युअल व्यासपीठ कलारसिकांसाठी ठरली पर्वणी!

इंडिया आर्ट फेस्टिव्हल'चे ऑनलाईन व्यासपीठ हे देशातील हजारो कलाकारांच्या आयुष्याला चालना देण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरत आहे. विशेष म्हणजे भारतीय कलारसिकांचा ऑनलाईन माध्यमातून कला, चित्र, शिल्प खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. फेस्टिव्हल सुरु झाल्यापासून संकेतस्थळाला  दिवसाला भेट देणाऱ्यांची संख्या ४,००० होती. आताही प्रत्येक दिवशी १०० ते २०० व्हिझिटर्स  कायम येतात.

कलाकारांचा प्रवास आणि या प्रवासाला दाद देणारे कलारसिक या दोघांचा एकाच व्यासपीठावर मेळ घडवून आणण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले जात आहे. कोव्हीड परिस्थितीमुळे अनेक कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक आर्ट गॅलरी अद्यापही पूर्णतः कार्यान्वित झालेल्या नाहीत.  मात्र या परिस्थितीतून कलाकारांना बाहेर आणून त्यांची वाटचाल उज्वल भविष्याच्या दिशेने घडविण्यासाठी यंदा प्रथमच ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले असून हे ऑनलाईन व्यासपीठ कलाकारांसाठी प्रभावी ठरत आहे.  १८ डिसेंबर २०२०पासून सुरु झालेल्या या फेस्टिव्हलला कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणात चित्र, शिल्प, कलाकृती यांची खरेदी होत आहे. हा प्रतिसाद पाहता फेस्टिव्हलचा कालावधी २० मार्च २०२१पर्यंत वाढविण्यात आला आहे. ४५ स्टॉल, २० आर्ट गॅलरी, २०० आर्टिस्ट आणि १०००हुन अधिक कलाकृती कलाप्रेमींना  www.indiaartfest.in या संकेत स्थळावर पाहता येणार आहे. तैलरंग, अॅक्रॅलिक्स, जलरंग, लँडस्केप आदी चित्र तसेच विविध शिल्प हे सर्व 2D रूम आणि 3D व्हर्च्युअल गॅलरी, ३६० डिग्रीमध्ये पाहता येणार आहे. मुंबई, त्रिपुरा, वाराणसी ते सिंगापूर आदी ठिकाणांच्या कलाकारांचा कला संग्रह आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे ऑनलाईन व्यासपीठ हे देशातील हजारो कलाकारांच्या आयुष्याला चालना देण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरत आहे. विशेष म्हणजे भारतीय कलारसिकांचा ऑनलाईन माध्यमातून कला, चित्र, शिल्प खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. फेस्टिव्हल सुरु झाल्यापासून संकेतस्थळाला  दिवसाला भेट देणाऱ्यांची संख्या ४,००० होती. आताही प्रत्येक दिवशी १०० ते २०० व्हिझिटर्स  कायम येतात.  2D रूम, 3D व्हर्च्युअल गॅलरी, ३६० डिग्रीमध्ये पाहण्याची सोय केल्यामुळे भारतीय कलारसिकांमध्ये ऑनलाईन माध्यमातून कलाकृती खरेदी करण्याची ओढ निर्माण झाल्याचे पाहून आनंद होतो” असे ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे संस्थापक आणि ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्ष राजेंद्र म्हणाले. ”फेस्टिव्हलमध्ये सहभागी कलाकारांना कलांच्या खरेदी संदर्भात दररोज विचारणा होत आहे. ऑनलाईन व्यासपीठामुळे कलाक्षेत्रात निर्माण झालेल्या या सकारात्मक बदलाचे स्वागत झाल्याचे प्रकर्षाने जाणवते” असेही ते पुढे म्हणाले.

या फेस्टिव्हलमधील कलाकृतींच्या खरेदीसाठी संबंधित कलाकारांशी संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येणार आहे. फेस्टिव्हलमधील कलाकृती पाहण्यासाठी नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून ‘एंटर’च्या केवळ एका क्लिकवर कलाप्रेमींना कलाकृती पाहता येणार आहे. कमीत कमी वेळा क्लिक करणे, कलाकृती सुस्पष्ट दिसण्यासाठी झूमची सोय, संबंधित कलाकाराच्या संपर्काची माहिती देण्यात आली आहे.  प्रत्येक स्टॉलवर कलाप्रेमी संबंधित कलाकाराला थेट संपर्क साधू शकतात किंवा मेसेज करू शकतात, प्रत्येक स्टॉलवरून ते डिजिटल कॅटलॉगसुद्धा घेऊ शकतात. दरवर्षी दिल्ली, मुंबई, बंगळुरू या ठिकाणी ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. ज्यामध्ये देशभरातील विविध कलांचा संगम एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो. ७०० हुन अधिक कलाकार, ५० आर्ट गॅलरी आणि ६००० चित्र, शिल्प प्रत्यक्ष पहायला मिळतात.

या फेस्टिव्हलमध्ये अनेक दिग्गज तसेच नवोदित कलाकारांचा सहभाग आहे. ज्ञानेश्वर माने, अनुश्री गुप्ता, मीना यादव, रश्मी पांचाळ, मयूर सोळंकी, आशा शेट्टे आदी अनेक कलाकारांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे.