पब्जीला टक्कर द्यायला आला भारतीय फौजी – अक्षय कुमारने केली घोषणा

पब्जी(pubg) हा गेम तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. भारतामध्ये ३ कोटींपेक्षा जास्त पब्जी युझर्स आहेत. केंद्र सरकारने पब्जीवर नुकतीच बंदी घातल्याची घोषणा केली होती. त्यामुळे पब्जी खेळणारे नव्या पर्यायाच्या शोधात होते. मात्र आता हा शोध संपला आहे. कारण पब्जीला तोडीस तोड फौजी( FAU-G) हा भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने(akshay kumar) यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत(atmnirbhar bharat) योजनेला पाठिंबा देत  FAU-G गेम सादर करताना अभिमान वाटत असल्याचे अक्षय कुमार याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २० टक्के निधी हा भारतीय जवानांना देण्यात येणार आहे, असेही अक्षयने म्हटले आहे. हा गेम खेळताना करमणुकीव्यतिरिक्त खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील.