भर लग्नात पोलंडच्या जोडप्याला भारतीय वंशाच्या पोरींनी आपल्या तालावर नाचावलं, VIDEO होतोय व्हायरल!

परदेशी लग्नात भारतीय तरुणींनी केला अप्रतिम डान्स, वधूवरांसोबत फॉरेनर्सनासुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही

    लग्न म्हंटली की डान्स, गाणं, मजा मस्ती ही आलीच. मग हे लग्न जगात कुठेही असो. पण भारतीयांच्या लग्नात जी धमाल चालते ती क्वचितच जगात कुठे असावी. असाच एक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो आहे पोलंडचे रहिवासी जोडप्याच्या लग्नताला. त्यात आपल्याला भारतीय वंशाच्या काही मुली आणि महिला दिसतात. यातील दोन मुलींचा या लग्नातील डान्स परफॉर्मन्स तुफान व्हायरल होत आहे.

     ‘बोले चुडीयां’ हे सुप्रसिद्ध असं गाणं सूरु होतं. या मुली एकेक करत सरस डान्स स्टेप्स करत परफॉर्मन्स सुरू करतात. पहिल्या गाण्यानंतर मग सुरू होतं एकदम जोशात गायलेलं ‘गल्लां गुडीयां’ हे गाणं. त्यावरही केलेला डान्स उपस्थितांची वाहवा मिळवून जातो. मग अजून एक मस्त परफॉर्मन्स. हा असतो घागरा या गाण्यावर. या गाण्याचे ‘बगदाद से लेके दिल्ली वाया आग्रा’ हे शब्द तर आपल्या ओठांवर नकळत येतात इतकं हे गाणं प्रसिद्ध आहे.

    पण शेवटी ज्यांचं लग्न आहे त्यांना यात सामील करून घेतल्याशिवाय डान्स पूर्ण होईल का? अर्थातच नाही. यामुळे पुढच्याच गाण्याच्या वेळी या दोन्ही मुली नवरा नवरीला डान्स फ्लोअर वर घेऊन येतात. मग काय पोलिश नवरा बायको आधीच या मुलींवर खुश झालेले असतात. आतापर्यंत केवळ बाजूला उभे राहून डान्सची मजा घेणारी सगळी जण डान्स फ्लोअर वर येतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.