sushant-singh-rajput

४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास १ महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता.

    सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन ९ महिने झाले आहेत. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या एक चर्चा रंगत आहे. केंद्र सरकार एका नॅशनल अवॉर्डला सुशांत सिंग राजपूतचे नाव देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार नेमक्या कुठल्या अवॉर्डला सुशांतचे नाव देणार हे अद्याप समजू शकले नाही.

    ४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास १ महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता. सध्या एनसीबी बॉलिवूड आणि ड्र्ग्ज कनेक्शनचा शोध घेत आहेत.

    स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून २००८ मध्ये टीव्ही क्षेत्रात सुशांतने पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती. पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.