दानिशचं स्वप्न साकार, त्याच्या आवाजाने करिश्मावरही झाली करिश्मा!

करिश्मानं स्टेजवर त्याच्यासोबत येऊन 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील प्रसिद्ध क्षण पुन्हा उभे करण्याची विनंती केली.

    या आठवड्यात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडॉल १२’ने नव्वदच्या दशकातील बॉलिवूड सुंदरी करिश्मा कपूरचं स्वागत करण्याची जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक महत्त्वाकांक्षी गायकाचं स्वप्न आणि इच्छा वास्तवात उतरवण्यासाठी हा म्युझिक रिअॅलिटी शो प्रसिद्ध आहे. या विकेंड एपिसोडमध्ये मोहम्मद दानिशचं स्वप्न पूर्ण होईल. ‘यारा ओ यारा मिलना हमारा…’ आणि ‘फुलो सा चेहरा तेरा…’ या लोलोच्या प्रसिद्ध  गाण्यांवर उत्तम परफॉर्मन्स दिल्यानंतर दानिशनं करिश्मा कपूरला नम्रपणं विनंती केली.

    करिश्मानं स्टेजवर त्याच्यासोबत येऊन ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील प्रसिद्ध क्षण पुन्हा उभे करण्याची विनंती केली. त्याची ही विनंती मोठ्या मनानं स्वीकारत, करिश्मा आणि दानिशनं ‘आए हो मेरी जिंदगी में…’ या गाण्यावर अभिनय केला. दानिशच्या परफॉर्मन्सबद्दल बोलताना करिश्मा म्हणाली की, डॅनिश, तू खूपच हुशार गायक आहेस. तुझं गाणं एवढं शक्तीशाली आहे की, मी पुन्हा त्या काळात गेले.

    करुनाकडून स्तुती ऐकल्यानंतर दानिश म्हणाला की, मला अक्षरश: स्वप्नात असल्यासारखं वाटलं! त्या खरोखरच खूप महान अभिनेत्री आणि डान्सर आहेत. या क्षणांसाठी मी इंडियन आयडॉलचा आभारी आहे.