अर्चना पूरण सिंगने केले दानिश मोहम्मदचे कौतुक, म्हणाली….

दानिश आणि अरुणिताने “मुझे नींद न आए’ आणि ‘घुंघट की आड से दिलबर का’ ही गाणी सादर केली, त्यावर कुमार सानू म्हणाला, “दानिश, मला तुझे गाणे फारच आवडते. तुझी गाण्याची आणि आवाज लावण्याची पद्धत फार छान आहे.

    सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 12  मध्ये या वीकएंडला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड हजारी लावणार आहेत. अप्रतिम परफॉर्मन्सेस तर असतीलच पण त्याच बरोबर या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायण पाहुणे परीक्षकांच्या सांगीतिक प्रवासाबद्दलचे काही अज्ञात किस्से सांगेल. परीक्षक अन्नू मलिक आणि हिमेश रेशमिया देखील सगळ्या परफॉर्मन्सेसचा आनंद घेताना आणि स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतील, ज्यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास नक्कीच आणखीन वाढेल.

    दानिश आणि अरुणिताने “मुझे नींद न आए’ आणि ‘घुंघट की आड से दिलबर का’ ही गाणी सादर केली, त्यावर कुमार सानू म्हणाला, “दानिश, मला तुझे गाणे फारच आवडते. तुझी गाण्याची आणि आवाज लावण्याची पद्धत फार छान आहे. तू एक प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहेस आणि त्यामुळे तुझे गाणे सगळ्यांच्यात उठून दिसते. तू आपल्या गुरूचा नेहमी मान राखतोस, जे तुझ्या यशाचे गमक आहे. देव तुझे भले करो.” या टिप्पणीनंतर कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड यांनी दानिशला मौला मेरे मौला चित्रपटातील ‘आंखें तेरी कितनी हसीं” हे त्यांचे आवडते गाणे म्हणण्याची विनंती केली.

    त्यानंतर आदित्य नारायणने अर्चना पूरणसिंहने सोशल मीडियावर दानिशच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले त्याबद्दल दानिशला विचारले असतं तो म्हणाला, “मी अर्चना मॅमचा प्रशंसक आहे आणि मला त्यांनी दिलेला पाठिंबा पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. त्यांना माझे गाणे आवडते हे समजल्यानंतर मला माझे पुढचे सगळे परफॉर्मन्स आणखी सरस करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”