tapsee panu

आम्ही दोघं तिथं बसलो असलो आणि असं काही घडतं तर आम्हाला सर्वांना घाम फुटू लागायचा आणि आपण काय करावं हे समजायचं नाही.

  तप्पसी पन्नू, विक्रांत मॅसे आणि हर्षवर्धन राणे यांचा नवीन चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील या तिन्ही कलाकारांना एका मुलाखतीत विचारलं गेलं की ते कधी ‘हॉट’ चित्रपट पाहताना पकडले गेले आहेत का? यावर तापसी पन्नूने आपल्या वडिलांबरोबर घडलेला एख किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

  तापसी म्हणाली, ‘बाबा बहुधा इंग्रजी अ‍ॅक्शन चित्रपट बघायचे.’ ‘आमच्याकडे फक्त एक टीव्ही होता, म्हणून जर वडिलांनी बघायला सुरुवात केली तर आमच्याकडे तोच चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नसायचा. आम्ही कधी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेलो नाही. चित्रपटांमध्ये लव्ह मेकिंग किंवा इन्टिमेट सीन्स असणं सामान्य गोष्ट आहे, मात्र जेव्हा आपली किशोरवयीन मुलगी आपल्या शेजारी चित्रपट पाहत असेल तेव्हा हे खूप विचित्र वाटतं. आम्ही दोघं तिथं बसलो असलो आणि असं काही घडतं तर आम्हाला सर्वांना घाम फुटू लागायचा आणि आपण काय करावं हे समजायचं नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

  ती पुढे म्हणाली की या विचित्र क्षणाला लक्ष वळवण्याचा तिच्यासाठी अगदी स्पष्ट मार्ग होता तो म्हणजे अचानक पाणी घेण्यासाठी उठणे किंवा चॅनल बदलणे. हे माझ्या बाबतीत अनेकदा घडलं आहे, मात्र एखाद्यानं पकडलं आहे असं कधीच नाही …’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

  यावर विक्रांत मेसी म्हणाला की तो आपल्या भावाबरोबर कुठलातरी चित्रपट पाहात होता आणि तेव्हाच त्याची काकू आली. हर्षवर्धन राणेंना बी-ग्रेडचा चित्रपट पाहण्याची आठवण झाली ते म्हणाले फक्त एक-दोन सीन पाहण्यासाठी कंटाळवाणा चित्रपट पाहिला होता.