तमिळ चित्रपटातून इरफान पठाण करणार कारकिर्दीला सुरूवात, चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

 भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan ) आता अभिनय क्षेत्रातही आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच चित्रपटसृष्टीत डेब्यू (Debut) करणार आहे. इरफान हा एका तमिळ चित्रपटातून (Tamil film) आपली कारकीर्द सुरू करत आहे.

भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan ) आता अभिनय क्षेत्रातही आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच चित्रपटसृष्टीत डेब्यू (Debut) करणार आहे. इरफान हा एका तमिळ चित्रपटातून (Tamil film) आपली कारकीर्द सुरू करत आहे. इरफानच्या ३६व्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करत त्याच्या फर्स्ट लूक पोस्टर रिलीज (first look poster release) करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी देण्यात आली. या पोस्टरमध्ये इरफानचा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे.

‘कोब्रा’ असे या तमिळ चित्रपटाचे नाव असून यात इरफान पठाण हा असलान यिलमाजची भूमिका साकारत आहे. यात तो एक फ्रेंच इंटरपोल अधिकारी म्हणून काम करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तमिळ सुपरस्टार चियान विक्रम मुख्य भूमिका साकारत आहे. चियान विक्रम हा एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारणार असून यात तो बहुरंगी लूक्सभमध्ये झळकणार आहे.

सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून तो लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. यात केएस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी आदी कलाकारही निर्णायक भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाबाबत इरफानच्या चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे.