irfan khan

इरफान खानचा मुलगा बाबिल लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तो नेटफ्लिक्सवरील चित्रपट कालामधून पदार्पण करणार आहे.

    अभिनेता इरफान खानच्या निधनाला एक वर्ष पुर्ण झालं आहे. मागील वर्षी २९ एप्रिलला इरफानने जगाचा निरोप घेतला. त्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. इरफानशी निगडीत किस्से, स्टोरी आणि अपूर्ण इच्छा त्याच्या पत्नी सुतापाने एका वर्षानंतर सांगितली आहे. इरफानच्या निधनाला एक वर्षे उलटल्यानंतर सुतापाने इरफानच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेबद्दल सांगितले.

    सुतापा म्हणाली, इरफानच्या जाण्यामुळे तिचे एकटेपण अजून गेलेलं नाही. तिला पुन्हा कामाला सुरूवात करायचे आहे. तिला लिखाणासाठी ऑफरदेखील मिळत आहे, मात्र तिला काम करता येत नाही. इरफानची एक इच्छा अपूर्णच राहिली. इरफान खानला मुलगा बाबिलसोबत चित्रपट बनवायचा होता. पण आता असे होऊ शकणार नाही. तिने सांगितले की, तो स्वतःसाठी आणि बाबिलसाठी चांगली स्क्रीप्ट शोधत होता.

    चित्रपटाची कथा एका कोचची स्टोरी आहे जो स्पेशल मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देतो आहे आणि मुले टुर्नामेंटदेखील जिंकतात. त्यांनी सांगितले होते की, मी हा चित्रपट बाबिलसोबत करू इच्छितो. मला या चित्रपटात अभिनय किंवा दिग्दर्शन करायचे आहे. जर मी अभिनय करू शकलो नाही तर दिग्दर्शन करेन. मग  अचानक सगळे काही संपून गेले.

    इरफान खानचा मुलगा बाबिल लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तो नेटफ्लिक्सवरील चित्रपट कालामधून पदार्पण करणार आहे.