आसावरीचा बबड्या चांगला की वाईट ? मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्विट

‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे”. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मास्क वापरणं एक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 मुंबई: कोरोना विषाणूचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी अनेक भन्नाट मिम्स शेअर केले जातात. तसेच मुंबई पोलीस ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक करत आहेत. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवाहन करताना यावेळी मुंबई पोलिसांनी अत्यंत भन्नाट कल्पना वापरली आहे. त्यामुळे या कल्पनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांनी एक ट्विट करताना चक्क आसावरीच्या बबड्याचं उदाहरण दिलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ बबड्याची भूमिका साकारत आहे. तसेच या मालिकेत बबड्याचे पात्र नकारात्मक दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या पात्रावर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी बबड्याचा फोटो ट्विट करत त्याने मास्क लावल्यामुळे, तो एक जबाबदार नागरिक असल्याचं म्हटलं आहे.