film city

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत चित्रपट सृष्टीतील दिग्गजांशी बातचीत करण्यासाठी आले. यावरून पुन्हा राजकारण सुरू झालं. कोणी आंदोलनं केली तर कोणी पोस्टरबाजी केली. मुंबईतून बॉलिवूड नेऊ शकत नाही अशी विधानही पुढे आली. पण खरच फिल्म सिटी मुंबईत राहीली आहे का? की या आधीच फिल्म सिटी मुंबईबाहेर गेलीये?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत चित्रपट सृष्टीतील दिग्गजांशी बातचीत करण्यासाठी आले. यावरून पुन्हा राजकारण सुरू झालं. कोणी आंदोलनं केली तर कोणी पोस्टरबाजी केली. मुंबईतून बॉलिवूड नेऊ शकत नाही अशी विधानही पुढे आली. पण खरच फिल्म सिटी मुंबईत राहीली आहे का? की या आधीच फिल्म सिटी मुंबईबाहेर गेलीये?

पण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरीची झालेली दुरावस्था यामुळे चित्रनगरी मुंबईबाहेर गेलीये असच म्हणावं लागेल. उत्तर प्रदेशातही काही वेगळा प्रकार नाहीये. उत्तर प्रदेश मध्ये या अगोदर हि शूटिंग झाल्या आहेत. मात्र त्याठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने आणि गुंडागिरी मुळे निर्माता तिथे जात नाही. निर्माता जातो ते गोव्याला. त्यामुळे फिल्म सिटी बाहेर नेण्यात येणार असा आरोप करणाऱ्यांनी एकदा या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा.

या परिस्थितीला सर्व पक्षीय राज्यकर्ते जवाबदार आहेत का?

पूर्वी फिल्म सीटीतच शुटींग करणाऱ्यावर निर्मात्यांचा भर होता. शूटिंग करताना फिल्म रीळ वाचवली म्हणजे बजेट मध्ये सिनेमा होत असे त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष दिलं जायचं. भरपूर रिहर्सल आणि त्यानंतर टेक घेणे यावर दिग्दर्शक प्राधान्य देत. लोकेशन निवडताना मुंबई जवळचे लोकेशन म्हणून फिल्म सिटी ला प्राधान्य असायचे , रिकाम्या मैदानावर विविध शूटिंग व्हायच्या यात स्टंट सिन पासून मोट्या मैदानावर भल्या मोठ्या सेट ची उभारणी केली जायची अगदी देवदास सिनेमा साठी हि भाला मोठा सेटसुध्दा फिल्म सिटीतच उभारण्यात आलेला.. फिल्म सिटीचे देव नसलेले देऊळ असो कि हेली पेड हि शान होती.

फिल्म सिटीमधील गुंडराज

मात्र शूटिंग सुरु झाल्या पासून ते संपे पर्यंत निर्मिती व्यस्थापक म्हणून काम करताना फिल्म सिटी मधील गुंडा राज चा सामना करावा लागत असे. शूटिंग सुरु करण्या करिता बुकिंग करायची म्हणजे बुकिंग क्लार्क ची खाजगी जागा आपल्याला देत असल्याचा भाव असे त्यातही मराठी चित्रपटाला निम्म्या किमतीत फिल्म सिटी उपलब्ध असल्याने मराठी चित्रपटाचे निर्माते फिल्म सिटी कडे वळत मात्र तेथील बाबू लोकांमुळे निर्मात्याला त्रास सहन करावा लागत असे. रिकामे असलेले लोकेशन आपल्याला हव्या असलेल्या तारखेला बुक आहे म्हणून सांगणे आणि मग काहीतरी करतो सांगून चिरीमिरी घेऊन ते लोकेशन उपलब्ध करून देणे. बुकिंग झाल्यावर शूटिंग च्या दिवशी सकाळी प्रथम लोकेशन वर आल्यावर लाईट डिपार्टमेंट मधून इलेक्ट्रीशन ला आणणे आणि त्याने आपल्यावर उपकार केले आहेत आणि त्याला सरकार पगार  देत नसावा म्हणून आपल्याकडे हक्काने पैश्याची मागणी केली जायची आणि जर दिली नाही तर विद्युत  पुरवठा सुरु होताना त्रास व्हायचा यावर  कटकट नको म्हणून मग पैसे दिले जायचे. अनेक वेळा तर लाईटच गुल होत असे त्यामुळे मग फिल्म  सिटी ता जनरेटर आणावा लागत असे आणि त्याचे नुकसान निर्मात्याला होत . अश्याच अधिकाऱयांच्या निष्क्रियतेमुळे आणि भ्रश्टाचारा मुळे चित्रनगरीतील डबिंग स्टुडियो बंद करावा लागला , एडिटिंग डिपार्टमेंट बंद झाले , मराठी चित्रपट सृष्ठीतील अतिशय उपयोगी असे केमेरा डिपार्टमेंट अश्या कर्मचाऱ्यांच्या मुळेच बंद झाले..

कलाकारानं साठी शौचालय घाणेरडे असल्याने निर्माता मग व्हॅनिटी व्हेन आणायला लागला आणि त्याच्या बजेट मध्ये वाढ झाली …रंगभूषा खोली भाड्याने दिले जायचे मात्र ते एव्हड्या खराब खोल्या होत्या कि त्या पैश्यात व्हॅनिटी व्हेन परवडायला लागली आणि फिल्मसिटी चे नुकसान सुरु झाले. याच चित्रपट नगरीत आगीच्या हि घटना झाल्या संपूर्ण सेट जाळून खाक झाले मात्र संपूर्ण अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नाही अशी अनेक उदाहरणे देता येतील

निर्मात्यांनी धरला बाहेरचा रस्ता

चित्रपट सृष्ठी बाहेर नेणार आहे ती रोखली पाहिजे म्हणणार्यानी चित्रपट सृष्ठीतून मोठा निर्माता कधीच निघून गेला आहे हे सांगावे लागत आहे. मुंबई च्या बाहेर काम करताना कामगारांना एका शिफ्ट ला अर्धी शिफ्ट चे पैसे जास्त द्यावे लागत तरी सुद्धा या चित्रपट सृष्ठीतून अनेक निर्माते बाहेर जाऊ लागले , सेट उभारण्याचे पेक्षा भरता बाहेर जाऊन शूटिंग परवडायला लागले. हिंदी  चित्रपटाचे चित्रीकरण देशाबाहेर होऊ लागले. बॉलिवूडकर तर मुंबईत शुटींग करण्यापेक्षा परदेशातच शुटींग करायला पसंती देतात.. त्यामुळे खरे पाहता आपली चित्रनगरी खूप सुंदर होती ती अजूनही सुंदर करता येईल , कामगार आणि निर्माते यांना जर सुविधा दिल्या तर काम चांगले होईल ,आणि पुन्हा निर्माता दादासाहेब फाळके चित्रनगरीत वळेल.