‘इस कदर’या गाण्यानं १०० दशलक्ष व्ह्यूजचा आकडा केला पार!

आपल्या प्रत्येक गाण्यात, प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी जादुगिरी करत तुलसीनं नेहमीच प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. सध्या तुलसीचं 'इस कदर' हे गाणं चांगलंच गाजत आहे.

    गायिका तुलसी कुमारनं नेहमीच आपल्या गायकीनं संगीतप्रेमींना अनोखा आनंद देत मंत्रमुग्ध केलं आहे. आज तिच्या नावावर बरीच हिट गाणी आहेत. ही जणू तिच्या लोकप्रियतेची पावतीच असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या प्रत्येक गाण्यात, प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी जादुगिरी करत तुलसीनं नेहमीच प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. सध्या तुलसीचं ‘इस कदर’ हे गाणं चांगलंच गाजत आहे.

     टी-सीरिजच्या ‘इस कदर’साठी तुलसी दुसऱ्यांदा दर्शन रावलसोबत एकत्र आली आहे. संगीतप्रेमींना ही केमिस्ट्री चांगलीच आवडत आहे. युट्यूबवर या गाण्यानं १०० दशलक्ष व्ह्यूजचा आकडा पार केला आहे. ‘इस कदर’ हे एक प्रेमगीत असून, त्याला कव्वाली वायबल्सचा साज चढवण्यात आला आहे. अरविंद्र खैरा दिग्दर्शित या गाण्यात तुलसी आणि दर्शन रावल आहेत. याबद्दल तुलसी म्हणाली की, गाण्याला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत मी प्रचंड आनंदी आहे.

    हे यश आमच्या टीममधील प्रत्येकाचं आहे. नेहमीप्रमाणेच आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो रसिकांना आवडल्याचं समाधान झाल्याचंही तुलसी म्हणाली. ‘इस कदर’ हे गीत सईद कादरी यांनी लिहिलं असून, साचेत-परम्परा यांनी संगीतबद्ध केलं आहे.