अभिनेत्रीला करायचं आहे त्याच्याशी लग्न पण त्यांच्या प्रेमात धर्माची झाली अडचण? पवित्रा पुनियाने केला मुलाखतीत खुलासा!

त्याचप्रमाणे माझं कुटुंब खूप मोठं आहे. एजाजबद्दल सगळ्यांना माहिती आहे. जर एखादी समस्या असती तर आम्हाला त्याबद्दल समजलं असतं. पण देवाच्या कृपेने असा कोणताही मुद्दा येत नाही. प्रत्येतजण आम्हाला एकमेकांना चांगल ओळखण्यासाठी वेळ देण्याचा सल्ला देत आहेत.’

  बिग बॉसच्या १४ व्या पर्वात अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. या दोघांचं बिग बॉसच्या घरात अनेक वेळा भांडणं झालं पण त्यांच्यातल प्रेम काही कमी झालं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पवित्राने धर्मामुळे त्याच्या रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले आहे. पवित्रा पुनियाच्या आईला एजाजच्या धर्मामुळे थोडी चिंता आहे. मात्र, तिच्या वडिलांना यात काहीच अडचण नाहीये.

  View this post on Instagram

  A post shared by Pavitra Punia (@pavitrapunia_)

   ‘एजाज आणि माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल माहित आहे. एजाजचे भाऊ आणि वडिलांनी आम्हाला बिग बॉसमध्ये पाहिलं आहे. एवढंच नाही तर माझा भाऊ देखील एजाजला ओळखतो. तो माझ्यासोबत असल्यामुळे एजाजला बऱ्याचदा भेटला आहे,’ असं पवित्रा म्हणाली.

  View this post on Instagram

  A post shared by Pavitra Punia (@pavitrapunia_)

  त्याचप्रमाणे माझं कुटुंब खूप मोठं आहे. एजाजबद्दल सगळ्यांना माहिती आहे. जर एखादी समस्या असती तर आम्हाला त्याबद्दल समजलं असतं. पण देवाच्या कृपेने असा कोणताही मुद्दा येत नाही. प्रत्येतजण आम्हाला एकमेकांना चांगल ओळखण्यासाठी वेळ देण्याचा सल्ला देत आहेत.’

  आईला एजाजच्या धर्मामुळे काय समस्या आहे या बद्दल पवित्राने पुढे सांगितले. ‘एजाज पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतून आला आहे. त्यामुळे माझ्या आईला वाटते की आम्ही आधी एकमेकांना चांगलं ओळखायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. तर माझे वडील आनंदात आहेत. जरी मी लिव्ह-इनमध्ये राहिली तरी त्यांना काही अडचण नाही आहे. पण, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी त्यांना विचारण हे महत्त्वाचं आहे. एजाजला पण असचं वाटतं आणि त्यांना ठावूक आहे की आम्ही दोघेही वेगवेगळ्या धर्मातून येतो.