सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर ट्रोल झालेली रिया दिसणार द्रौपदीच्या भूमिकेत!

“या चित्रपटात महाभारत ही कथा आणि द्रौपदीचं पात्र हे वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्याची कथा ही आधुनिक आणि सध्याच्या काळावर आधारीत असणार आहे.

    काही दिवसांपूर्वी ‘द टाइम्स ५० मोस्ट डिजायरेबल वुमन २०२०’ च्या लिस्टमध्ये रिया नंबर १ ला होती. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर चर्चेत आली. ऑनलाइन मतदानात मिळालेल्या मतांवर आणि अंतर्गत निर्णायक मंडळींनी हा निर्णय घेतला आहे. लवकरच रिया महाभारत या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात महत्वाची भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

    द्रौपदीच्या भूमिकेत रिया

    “या चित्रपटात महाभारत ही कथा आणि द्रौपदीचं पात्र हे वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्याची कथा ही आधुनिक आणि सध्याच्या काळावर आधारीत असणार आहे. द्रौपदीच्या भूमिकेसाठी रियाला विचारण्यात आलं आहे. सध्या ती या भूमिकेवर विचार करत आहे. आतापर्यंत फक्त चर्चा सुरु आहे.”

    दिवंगत अभिनेता सुशांतच्या निधनानंतर रियाला ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र, आता रिया पूर्वपदावर येत असल्याचे दिसतं आहे. रिया लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाशमी, अन्नू कपूर, रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता.