
साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विजयसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. आणि आता ही जोडी मनीष मल्होत्राच्या पार्टीत एकत्र दिसली आहे. त्यामुळे हे दोघं बॉलीवूडची नवीन जोडी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता- अभिनेत्रींच्या पटापट जोड्या जुळवल्या जातात. काही जोड्या खऱ्याही असतात तर काही केवळ अफवा. आता एका नवीन जोडीची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान तिच्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटामुळे चर्चेत होती. पण आता ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अलीकडेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच एक हाऊस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीसाठी सारा अली खानही आली होती. यापूर्वी साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विजयसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. आणि आता ही जोडी मनीष मल्होत्राच्या पार्टीत एकत्र दिसली आहे. त्यामुळे हे दोघं बॉलीवूडची नवीन जोडी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विजय देवरकोंडा ‘लिगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खानला विजय देवरकोंडाबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मनीष मल्होत्राच्या या पार्टीत करण जोहरही होता. करण जोहरच्याच लिगर चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.