‘तारक मेहता…’मधील आणखी एक अभिनेत्री सोडणार मालिका? प्रेग्नंट असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला!

अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

    लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. आता नेहा पाठोपाठ अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. आता मालिकेतील रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाला ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. जेनिफर ही प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण  जेनिफरने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये वक्तव्य करत तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

    ‘मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे मला अनेकांनी फोन आणि मेसेज केले आहेत. तसेच मी प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याचे देखील म्हटले जात आहे. पण या सर्व अफवा आहेत. मला गेल्या काही दिवसांपासून बरं वाटत नाही. माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालता देखील येत नाही. त्यामुळे मी दमणला चित्रीकरणासाठी जाऊ शकले नाही. मी मालिकेच्या टीमच्या संपर्कात असते. पण लोक अशा अफवा का पसरवतात मला कळत नाही.’