अभिनेत्री, खासदार नुसरत जहाँ प्रेग्नंट, सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा!

नुसरत यांनी २०१९ मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

  अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. कधी आपल्या वक्तव्यामुळे तर कधी आपल्या फोटोशूटमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. सध्या नुसरत जहाँ या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nusrat (@nusratchirps)

  नुसरत या सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत. तसेच नुसरत यांचा पती निखिल जैनला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटलं जात आहे. त्याचबरोबर नुसरत आणि निखिल यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  मात्र नुरसत प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर त्यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nusrat (@nusratchirps)

  नुसरत यांनी २०१९ मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे यशने म्हटले होते. एखादी चांगली गोष्ट असो किंवा वाईट, खासगी आयुष्याशी संबंधीत कोणत्याही गोष्टीवर नुसरत यांनी बोलण्याल नकार दिला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nusrat (@nusratchirps)