‘या’ प्रसिद्ध अभिनेता – अभिनेत्रींनी घेतला लग्नाआधीच एकत्र राहण्याचा निर्णय!

बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक जोड्या आहेत ज्यांनी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणं पसंत केलं.

  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर

  सगळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नसोहळा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र लग्नापूर्वी दोन वर्षांपासून मिताली आणि सिद्धार्थ लिव्ह-इनमध्ये राहत होते.

  इशा केसकर – ऋषी सक्सेना

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ISHA (@ishagramss)

  जय मल्हार मालिकेत बानूची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री इशा केसकर ही तेवढीच गाजली. गेल्या तीन वर्षांपासून ईशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे तिने सांगितले होते. ऋषी आणि ईशाच्या नात्याला २९ जुलै रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्याचे ईशाने सोशल मीडिया पोस्टद्वार सांगितले.

  सखी गोखले व सुव्रत जोशी

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

   

  ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी आणि सुव्रतची जोडी घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतही दोघांनी एकत्र काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येमध्ये राहत होते. हे दोघं सध्या लंडनमध्ये आहेत.

  आदिश वैद्य – रेवती लेले

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Revati Lele (@me_revati)

  ‘रात्रीस खेळ चाले’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेतून, तर ‘सेक्स, ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता आदिश वैद्य आणि ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेवती लेले अभिनेता आदिश वैद्यला डेट करत आहे. आदिश आणि रेवती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.

   ऊर्मिला निंबाळकर

   

  अभिनेत्री आणि व्हिडिओ ब्लॉगर ऊर्मिला निंबाळकर सगळ्यानांच माहिती आहे. ऊर्मिलानं हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती ही तिची मालिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ऊर्मिला आणि सकीर्त एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यानंतर बरोबर ८ वर्षांनी मुहूर्त वगैरे काहीही न बघता त्याच दिवशी ९ फेब्रुवारीला आम्ही लग्न केलं. लग्नापूर्वी ऊर्मिला आणि सकीर्त लिव्ह-इनमध्ये राहत होते.