जॅकलीन अमांडा सेर्नीसोबत करणार व्हिडिओ पॉडकास्ट शो

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर ९० मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. आता ती एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांसाठी जॅकलिनची ‘हरवलेली बहिण’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अमांडा सेर्नी या शोमध्ये जॅकलिनसोबत दिसणार आहे. अमांडाचे देखील यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ४५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून अमांडा हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

जॅकलीन अमांडाच्या या नव्या पॉडकास्ट व्हिडिओ शोचे नाव असणार आहे ‘फील्स गुड’. यामध्ये जगभरातील प्रेरणादायक बातम्या, समीक्षा आणि अनपेक्षित पाहुण्यांसोबतच्या भेटीगाठी असणार आहेत. या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि संस्कृती यांवरच्या चर्चा असून यातील कंटेंट दर्शकांना सकारात्मकतेच्या अंगाने नेणारा असेल. हा शोची घोषणा पॉडकास्ट मंचावरील प्रसिद्ध पॉडकास्ट वनद्वारे करण्यात आली आहे.या शो विषयी बोलताना जॅकलिन आणि अमांडा म्हणाल्या की, आम्ही जे करतो ते आम्हाला आवडते आहे आणि वेलनेस, संस्कृती, डेटिंग, सकारात्मक बातम्यांसोबत कधी कधी अनपेक्षित पाहुणे ही संकल्पना आहे. या नव्या मंचाच्या विचारानेच आम्हाला खूप उत्साह वाटत आहे.