जॅकलीनने महाराष्ट्रातील ‘या’ दोन गावांना घेतलं दत्तक

हे माझ्या मनात खूप आधीपासूनच होतं. गाव दत्तक घेण्याचा विचार कित्येक दिवसांपासून मनात होता. सध्या आपण सगळेच कोरोना विषाणूसारख्या कठीण काळाचा सामना करत आहोत. अशा काळात काही लोक जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे.

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने महाराष्ट्रातील दोन गावांना दत्तक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन गावांच नाव पाथर्डी आणि सकुर असल्याचं सांगितलं जात आहे. या गावांतील कुपोषितांना सकस आहार मिळवा यासाठी जॅकलिन आणि तिची टीम प्रयत्न करणार आहे. जॅकलिननं नुकत्याच झालेल्या तिच्या वाढदिवसानिमित्त ही दोन गावं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी तिने ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’सोबत करार केला. या गावातील जवळपास १५०० लोकांची तीन वर्षांसाठी ती मदत करणार आहे. त्यामुळे या गावातील लोकांसाठी हा खूप आनंदचा क्षण आहे.   

हे माझ्या मनात खूप आधीपासूनच होतं. गाव दत्तक घेण्याचा विचार कित्येक दिवसांपासून मनात होता. सध्या आपण सगळेच कोरोना विषाणूसारख्या कठीण काळाचा सामना करत आहोत. अशा काळात काही लोक जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे. मी दत्तक घेतलेल्या या दोन गावांतील जवळपास १५५० लोकांपर्यंत आम्ही मदत पोहोचवणार आहोत. इतकंच नव्हे तर गावातील महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत वैद्यकीय सहाय्य देण्यात येईल. असे जॅकलिन म्हणाली. 

दरम्यान, जॅकलीनचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाचं नाव ‘अटॅक’ असं आहे. या चित्रपटात जॅकलीन बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.